October 6, 2022

मुख्य संपादक-अशोक होळकर मो-9130117000

संबंध मानवजातीला जिवंत राहण्यासाठी बांबू लागवड करावीच लागेल – पाशाभाई पटेल

1 min read

बीड येथे बांबू लागवड संवर्धन .. पृथ्वीरक्षण अभियानाच्या बैठकीत आवाहन

बीड (प्रतिनिधी) शेतकरी नेते माजी आमदार पाशाभाई पटेल यांच्या विद्यमाने बीड येथे बांबू लागवड.. पृथ्वीरक्षण अभियानाच्या अनुषंगाने महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला शेती उत्पन्न वाढ व पर्यावरण संवर्धनासाठी काम करण्यास उत्सुक असलेले प्रतिष्ठित व्यक्ती, सामाजिक संस्था प्रतिनिधी तसेच कार्यकर्ते, व्यापारी, डॉक्टर, पत्रकार, शेतीनिष्ठ शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी प्रतिनिधी आदींसह सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वांची या बैठकीस प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थिती होती.
या बैठकीत पाशाभाई पटेल यांनी बांबू लागवडीचे फायदे विषद करत असताना बांबू लागवडच शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारे उत्पादन अन जगाला कार्बनच्या संकटातून वाचवणारे असल्याचे म्हंटले. या बैठकीला माजी नगराध्यक्ष दिलीप गोरे, निझाम शेख, अशोक हिंगे, कवडे सर, जाहेर पाटील, चंद्रकांत फड, दत्ता जाधव, किरण बांगर, धनंजय गुंदेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
बीड शहरातील जिजाऊनगर येथील बंशीधर सभामंडप येथे या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी पाशाभाई पटेल यांनी बांबु लागवडीबाबत इतमभूत माहिती दिली. बांबू हे जगातील सर्वात वेगाने वाढणारे झाड हे बांबू आहे. जगाचा विनाश तापमान वाढीतून टाळायचा असेल तर झाडं लावणे आवश्यक आहे. हे झाड बांबू असेल तर लागवड करणाऱ्याच्या फायद्यासह पर्यावरणाचे रक्षण होईल. मानव जात वाचवायची असेल तर बांबू लागवडीशिवाय पर्याय नसल्याचे ते म्हणाले. बांबू लागवडीतून वार्षिक एकरी 1 लाख रुपये उत्पन्न मिळू शकते हे त्यांनी आकडेवारी सांगत शेतकऱ्यांना समजून सांगितले.

Spread the love
Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.