October 6, 2022

मुख्य संपादक-अशोक होळकर मो-9130117000

घरात घुसून हात धरल्याप्रकरणी आरोपीस जामिन मंजूर -अ‍ॅड. तेजस नेहरकर

1 min read


बीड (प्रतिनिधी):- घरात एकटीस गाठून तु मला आवडतीस तु माझे सोबत लग्न कर असे म्हणून हात धरून विनयभंग केल्याप्रकरणी मा.प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी बीड यांनी आरोपीस जामीन मंजूर केला आहे. सविस्तर वृत्त असे की, सावंत यांचे विरूध्द नेकनूर पोलिस स्टेशन येथे दि. 10/01/2021 रोजी कलम 354, 354 (ड) 452, 507 भारतीय दंड संहिता 1860 नुसार गुन्हा दाखल झाला होता. सदरील प्रकरणी आरोपीचे वतीने अ‍ॅड. तेजस सुभाष नेहरकर यांनी भक्कम बाजु मांडून युक्तीवाद केल्यामुळे या विनयभंग प्रकरणी गंभीर आरोपातून मा.न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर केला आहे. सदर आरोपीचे जामीन प्रकरणी नेकनूर, पाटोदा, या भागातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने ग्रामस्थांचे लक्ष घागले होते. या प्रकरणी अ‍ॅड. तेजस नेहरकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Spread the love
Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.