November 29, 2022

मुख्य संपादक-अशोक होळकर मो-9130117000

सकल मराठा समाजाच्या वतीने केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची घेतली भेट

1 min read

बीड (प्रतिनिधी)सकल मराठा समाजाच्या वतीने केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेबांची भेट घेतली आणि 50% च्या आतच मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळावे यावर चर्चा केली आणि निवेदन सुद्धा दिले. 23 मार्च 1994 च्या ‘जी आर’ मुळे मराठ्यांचे कसे नुकसान झाले, हे तर सांगितलेच पण त्याच सोबत आरक्षणाच्या इतिहासाचा पट उलगडत मराठ्यांवर अन्याय कसा कसा केला गेला ? हे ही निदर्शनास आणून दिले.

आम्ही दलीत आणि आदिवासी समाजाच्या आरक्षणाचा सन्मान करतो. त्या 20% आरक्षणातून आमची मागणी नाही. तुमच्या आरक्षणाचे काहीच नुकसान होणार नाही. त्यामुळे सर्व दलीत नेत्यांनी मराठ्यांच्या ओबीसी आरक्षण मागणीला पाठिंबा द्यावा. आमच्याकडे जेंव्हा सत्ता होत्या जेंव्हा गरज होती तेंव्हा आम्ही भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा इतरही समाजांना भरभरून मदत केली. राजर्षी शाहू महाराजां ना मानणारे तुम्ही आहात. त्यामुळे आज मराठा समाज अडचणीत असताना आपण आम्हाला सहकार्य करावे हीच अपेक्षा आहे. या निमित्ताने दलीत मराठा संबंध अधिक प्रगाढ होणार असतील तर ती रिस्क तुम्ही घेतली पाहिजे.

सामाजिक न्याय मंत्री या नात्याने आपण मराठ्यांची भूमिका समजून घ्यावी आणि आमच्यावर जो अन्याय होतोय तो दूर करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे ही विनंती देखील केली.

आठवले साहेबांनी सुद्धा आश्र्वस्त केले की आम्ही तुमच्या या भूमिके सोबत आहोत. जे जे शक्य ते सहकार्य करत राहू.

योगेश केदार
9823620666

Spread the love
Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.