November 29, 2022

मुख्य संपादक-अशोक होळकर मो-9130117000

ना.छगन भुजबळ यांच्यासमोर योगेश केदार सह अन्य मावळ्यांनी ठणकावून मराठ्यांची बाजू मांडली.

1 min read

छगन भुजबळ यांना ठणकावून मराठ्यांची बाजू मांडली. मोठा विवाद झाला. आज त्यांना कळले असेल की मराठे सुद्धा किती तयारीचे आणि ठाम असतात. भुजबळ साहेबांच्यात मराठा द्वेष ठासून भरलाय हे मात्र निश्चित. तो द्वेष योग्य प्रकारे योग्य वेळी कमी करण्याचे औषध सामान्य मराठ्यांकडे आहे.

बैठकीच्या सुरुवातीलाच भुजबळ बोलले की 27% च्या आत येऊ देणार नाही. त्याव्यतिरिक्त तुम्ही घेणार असाल तर बोलू? आम्ही म्हणालो की संविधानाच्या कोणत्या कलमानुसार तुम्ही हे बोलताय? भारतरत्न डॉ बाबासाहेबांनी कुठे लिहून ठेवलंय का, मराठा समाजाला आरक्षणच देऊ नका म्हणून? मी म्हणालो 23 मार्च 1994 च्या ‘जी आर’ वर बोला. त्याची श्वेतपत्रिका काढा ना मग? ते म्हणाले, मला त्याबाबत जास्त अभ्यास नाही. आम्ही म्हणालो तुमचा अभ्यास करवून घेऊ. एक गोष्ट सांगा, मग तुम्ही राज्यात ओबीसी हे 54% आहेत असे कोणत्या आधारे बोलता? तुम्हीच नेमलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाने ओबीसींचा आकडा फुगवून सांगितला तरी तो 32% च असल्याचा अहवाल दिला. 2011-12 च्या जनगणनेचा आकडा सुद्धा महाराष्ट्रात सर्व ओबीसी हे 34% आहेत. मग या संख्येच्या अर्धेच आरक्षण तुम्ही घ्या. त्याव्यतिरिक्त असलेले मराठ्यांना सोडा.

वीस पंचवीस मिनिट आम्ही ठासून बोलत होतो. भुजबळ साहेब तुम्ही पुरोगामी विचार मांडता. त्यात मराठा येत नाही का? बहुजन बहुजन म्हणता त्यात मराठा बसत नाही का? मग याचा अर्थ तुम्ही कथित बेगडी पुरोगामी राजकारणी लोकांनी मराठ्यांचा केवळ वापर केला का? प्रतिगामी राजकारणी लोकांनी सुद्धा मराठ्यांचा केवळ वापर करून घेतला. यापुढे आम्ही ते होऊ देणार नाही.

भुजबळ म्हणाले, तुम्ही सरकार कडे मागणी करा. माझ्याकडे करू नका. आम्ही म्हणालो तुम्ही आता मंत्री आहात म्हणजे सरकारच आहात ना? की मंत्री पदावर बसून सुद्धा स्वतःला बाहेरचे समजता?

प्रचंड मोठा विवाद झाला. शेवटी कंटाळून ते म्हणाले मी तुमच्या मुद्द्यांचा अभ्यास करतो. आम्ही म्हणालो, तुम्ही आता निवेदन घ्या. ते म्हणत होते मी हातात घेणार नाही. आम्ही म्हणालो तुम्हाला निवेदन घ्यावेच लागेल. आम्ही कुणी ऐरे गैरे नाही आहोत. नाशिक च्या मूक आंदोलनामध्ये मराठे जेंव्हा तुमच्या अंगावर धाऊन आले त्यावेळी त्यांना शांत करणाऱ्या पैकी मी एक होतो. त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांना दाखवता तो अहंकार चालणार नाही. शेवटी त्यांनी निवेदन स्वीकारले.असे योगेश केदार यांनी सांगितले.

Spread the love
Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.