November 29, 2022

मुख्य संपादक-अशोक होळकर मो-9130117000

पिंपळनेर करांच्या पाण्यासाठी आम आदमी पार्टी आंदोलन करणार – अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी.

1 min read

बीड (प्रतिनिधी) पिंपळनेर -पिंपळनेर गावामध्ये पाण्याची कृत्रिम तीव्र टंचाई प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे होत आहे या गावांमध्ये तीन पिण्याच्या पाण्या च्या योजना शासनाच्या राबवल्या गेल्या परंतु या तिन्ही योजना भ्रष्ट कारभाराच्या बळी पडलेल्या आहेत असे दिसून येते आम्ही ज्या वेळेस या गावकऱ्यांनी आम आदमी पार्टी संपर्क साधला असता आम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहिले या गावांमध्ये तीन तीन पाण्याच्या टाक्या बनलेल्या असून या गावच्या लोकांना पाणीपुरवठा एक महिना होत नाही या ठिकाणी बनलेल्या पाण्याच्या टाकीवर वरचा स्लॅब नाही येथील ग्रामसेवक जनप्रतिनिधी अधिकारी व प्रशासनाने सर्व संगनमताने या गावच्या पाणीपुरवठा योजना भ्रष्ट कारभाराच्या घशात घालण्याचे काम झालेले आहे असा आरोप आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे. जर या पाणीपुरवठा सुरळीत केला नाही तर आम आदमी पार्टी व तेथील सर्व ग्रामस्थ या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभे करणार आहे आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना पत्र देऊन या सर्व गोष्टी अवगत केल्या गेल्या आहेत या गावातील सर्व युवा कार्यकर्ते युवक व्यापारी शेतकरी व सर्व नागरिक या गोष्टीला घेऊन आम आदमी पार्टीच्या कार्यालयामध्ये आले असता व आम आदमी पार्टी स्वतः सर्व टीम ने जाऊन त्या गावची परिस्थिती पाहिली आणि येऊन हे सर्व प्रकार जिल्हाधिकाऱ्यांना व जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना अवगत केलं जरा आठ दिवसाच्या आत यावर ती तोडगा नाही निघाला तर आम आदमी पार्टीच्या नेतृत्वामध्ये या गावचे समस्त नागरिक रस्त्यावर उतरतील याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल असे प्रशासनाला खडसावून सांगण्यात आले आहे यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे व भीमराव कुठे तालुका अध्यक्ष आम आदमी पार्टी पिंपळनेरचे भागवत कदम भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारी अध्यक्ष माननीय डॉक्टर गणेश ढवळे तालुकाध्यक्ष शेक युनुस माननीय बाळासाहेब मोरे भाजप किसान मोर्चा तालुकाध्यक्ष आझम खान तालुका उपाध्यक्ष आम आदमी पार्टी माउली जाधव विशाल करपे अनिल कोकरे स्वप्नील राजाभाऊ शिरसाठ अंकुश तागड सिद्धेश्वर बंडू हौसले व आम आदमी पार्टीचे जिल्हा सचिव रामधन जमाले रामभाउ शेरकर शहर प्रमुख सय्यद सादेक इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Spread the love
Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.