November 29, 2022

मुख्य संपादक-अशोक होळकर मो-9130117000

राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने डॉ.बाबु जोगदंड सन्मानित

1 min read

(बीड प्रतिनिधी) समाजाचा आरसा आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या वर्तमानपत्राला आजही तितकंच अनन्यसाधारण महत्त्व आहे. समाजकारण राजकारण प्रशासन आणि सर्वच एकंदरीत व्यवस्था व्यवस्थित करण्याचे काम वर्तमानपत्र मिडिया करत असते. प्रशासनाला सुतासारखं सरळ करणार भ्रष्टाचाराला जॉब करणारे अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारे आणि गोर गरीब शोषित पीडितांना न्याय देणारे मुंबई मधील प्रसिद्ध वर्तमानपत्र संपादक संजय पवार यांचे दैनिक लोकांकीत च्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त पनवेल येथील प्रसिद्ध हॉटेल रेडविंग कॅस्टल येथे दिनांक २९ मे २०२२ रोजी राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्काराचे आयोजन केले होते. यावेळी सबंध महाराष्ट्र मधून राजकीय,सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, वैद्यकीय, अभिनय, सांस्कृतिक, मीडिया या सर्व क्षेत्रातील अग्रगण्य अशा व्यक्तींना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देण्यात आला.

यावेळी बीड जिलाहयातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेते तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबु जोगदंड यांनी आता पंर्यत गोरगरिबांना अन्नदान करून विविध सन ,महापुरूषांच्या जयंत्या साजरया करतात.धरणी मातेची सेवा म्हणुन सतत वृक्ष लागवड ,विद्द्यार्थ्यांनाही खाऊचे वाटप , कोरोना सारख्या महामारीमध्ये मोफत राशन, किराणा, अनाथाना अन्नदान व गरजवंत लोकाना आर्थिक मदत केली होती डॉ.बाबु जोगदंड हे सामाजिक, राजकिय व्यक्तीमत्तव असल्याकारणाने त्यानी अनेक गोरगरिबांना न्याय मिळवून दिला आहे. या सर्व कामाचा आढावा घेऊन त्यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी म्हाडा चे संचालक विश्वास कोळी, पनवेल महानगर पालिका विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हाञे, प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, निर्माता अमोल भावे, लग्नाची बेडी फेम सिधेश प्रभाकर, अलबत्या गलबत्या फेम श्रद्धा हांडे, मुरंबाफेम अमोल सावंत, बीड तालुक्याचे चे युवानेते तथा पञकार विवेक कुचेकर , लोकमत चे ज्येष्ठ पत्रकार मयूर तांबडे आदी विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकिय क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होते.

Spread the love
Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.