November 29, 2022

मुख्य संपादक-अशोक होळकर मो-9130117000

राजूला वाचविण्यासाठी हवेत दानशुरांचे हात

1 min read

लिव्हरफेलझाल्यानेशस्त्रक्रियेसाठीलागतायत25लाख_रूपये

बीड-(प्रतिनिधी) कबाड कष्टकरून जीवन जगणारा तो बाप आपल्या पोटच्या गोळ्याला वाचविण्यासाठी दारोदार हिंडतोय. मदतीचे आस करतो. कु. राजेश प्रकाश राठोड, वय वर्षे 22 रा. वारोळा ता.माजलगाव जि.बीड एमपीएससीमधील एक पुर्व परिक्षा पास.संपूर्ण पत्ता सांगण्याचे कारण हेच की सध्या हा मुलगा मृत्यूच्या दाढेत उभा आहे. त्याला तेथून परत आणण्यासाठी किमान 25 लाख रुपयांची आवश्यकता आहे. त्याचे वडील आणि भाऊ संदेश हा मदतीच्या याचना करीत दारोदारी फिरतायत. समातातील दानशुर व्यक्तींनी जर त्याला मदत केली तर बीड जिल्ह्यातील एका होतकरू तरूणाचे प्राण वाचणार आहेत.
काही दिवसापुर्वी ताप येत असल्याने तो तेथील डॉक्टरांच्या सल्लयानुसार गोळ्या घेत राहिला. परंतू ताप काही कमी झाली नाही. त्यानंतर त्याने माजलगाव येथील संजिवणी हॉस्पीटलमधे उपचार घेण्यासाठी दाखल झाल्यानंतर त्याला काविळ झाल्याचे समजले. परंतू त्यावरही ते राहित नसल्याने तेथील डॉक्टरांनी औरंगाबाद येथील रुग्णालयात रेफर केले मात्र त्याठिकाणी त्याचा उपचार न झाल्याने त्याला पुणे येथील सह्याद्री सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील तपासणीनंतर त्याचे लिव्हर फेल झाल्याचे समजल्यानंतर संपुर्ण कुटूंब हदरले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रियेची गरज असल्याचे डॉ.विपीन विभुते यांनी सांगितले. यासाठी 25 लाख रुपयांचा खर्चही येणार असल्याचे हॉस्पीटल्च्यावतीने सांगण्यात आले. एवढी मोठी रक्कम आणायची कुठून म्हणून संपूर्ण कुटूबिय हैराण झाले. त्याच दरम्यान विविध सामाजिक संघटना तसेच राजकीय नेत्याशी संपर्क करून केला मात्र त्यांना अद्यापही सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. सामाजिक संस्था आणि दानशुर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज आहे. आज आपल्या दानशुर हातामुळे एका होतकरून तरूणाचा जीव वाचू शकतो. तरी ज्याला जसे जमेल त्या पद्धतीने राजूला वाचविण्यासाठी मदत करावे. संपर्क संदेश पवार (भाऊ) मो.9689444030 ज्याला कुणाला मदत करायचे आहे त्यासाठी वडील प्रकाश भाऊसाहेब पवार स्टेट बँक ऑफ इंडिया खाते क्रमांक 31226082772 हे आहे.
नितीन चव्हाण, उपसंपादक दैनिक लोकाशा बीड
मो.9689959088

Spread the love
Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.