November 29, 2022

मुख्य संपादक-अशोक होळकर मो-9130117000

खरं तर डाॅ.उत्कर्ष गुट्टे यांची ईडीमार्फत चौकशी हवी:-डाॅ.गणेश ढवळे

1 min read


बीड (प्रतिनिधी)नुकतीच बीडचे तत्कालीन मुख्याधिकारी नगरपरिषद बीड डाॅ.उत्कर्ष गुट्टे यांचे निलंबन झाल्याची बातमी आली तसं पाहीला गेलं तर मुजोर,भ्रष्ट आधिका-यांचं निलंबन नव्हे तर बडतर्फ करायला हवं आणि त्यांच्या संपत्तीची ईडीमार्फत चौकशी व्हायला हवी…
बीड नगरपरिषद प्रशासनातील अनागोंदी कारभार तसेच रस्ता;कचऱ्यापासून अगदी कोरोना कालावधीत कोरोनाने मयत अंत्यविधी निधीतील गैरव्यवहार आणि ईतर गैरव्यवहार प्रकरणात यांनी मेलेल्या माणसाच्या कपाळावरचं लोणी खाणारा माणूस म्हणून मुर्तिमंत ऊदाहरण आहे…
महिलांसाठी नगररोड वरील शासकीय कार्यालयासमोर स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्यात आली नसताना संकेतस्थळावर २५ शौचालये उपलब्ध असल्याची खोटी माहीती देतो,बीड नगरपरिषद महिन्याला २७ लाख रूपये आणि वर्षाकाठी साडे ३ कोटी अमरावतीच्या कनक एन्ट्रप्रायजेसवर खर्च करून सुद्धा बीड शहराची कचराकुंडी झालीय.
बीड शहरातील विविध रस्त्यामधील गैरव्यवहार प्रकरणात तर सांगायलाच नको रंग बदलणा-या सरड्या सारख्या बोगस काम करणा-या कंपन्या प्रस्थापितांच्या आहेतच .
नदीपात्रातील अनाधिकृत बांधकाम प्रकरणात ठेकेदार आणि राजकारणी आणि सणासुदीला गोरगरीबांना अन्नदान करून दैनिकात प्रसिद्ध देणारे दानशूर आहेतच भुमाफियांचीही पाठराखण…

बीड शहरात कुटुंबायासह मतदान असुन नगरपरिषदेच्या मतदान प्रक्रियेत सहभाग घेऊन उच्च न्यायालयाची ऐशीतैशी करणारे डाॅ.उत्कर्ष गुट्टे….
पण आपण एक विसरतोय डाॅ.उत्कर्ष गुट्टे एकटा मुजोर आधिकारी नाही त्याला अभय देणारी पाठराखण करणारी बीडची राजकीय नेतेमंडळी बीडच्या विनाशास जास्त कारणीभूत आहेत.

Spread the love
Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.