October 6, 2022

मुख्य संपादक-अशोक होळकर मो-9130117000

ठेवीदारांनो झोपेत धोंडा पडण्याअगोदरच जागे व्हा !

1 min read

मल्टिस्टेट आणि पतसंस्था विश्वास गमावू लागल्याने चांगल्या बँकाही अडचणीत

भाग (१)

बीड (प्रतिनिधी)
पै पै करून आयुष्य भराची पुंजी जमा करून भविष्यात काहीतरी कामी येईल म्हणून सामान्य लोक ,व्यापारी सुरक्षित ठिकाणी म्हणजे बँकेत पैसे ठेवतात, परंतु असा धोका होईल असे कोणाच्या मनी ना ध्यानी नसते आणि झोपीत धोंडा घातल्या सारखे रात्रीतूनच हे महाठग गायब होत असल्याने ठेवीदारांच्या पायाखालची जमीन सरकते असे एक ना अनेक प्रकार घडून देखील ठेवीदार राष्ट्रीयीकृत बँकेकडे ठेवी ठेवत नाहीत ही खरोखरच शोकांतिका म्हणावी लागेल.

अनेक मल्टिस्टेट पतसंस्थांनी चालकांनी ठेवीदारांच्या ठेवींवर  डल्ला मारून फरार झाल्याच्या घटना बीड जिल्ह्यात नवीन नाही तरी सुद्धा लोक अश्या मल्टिस्टेट आणि पतसंस्थांच्या आकर्षक व्याजदराच्या आमिषाला बळी पडत आहेत ही खरोखरच चिंतेची बाब म्हणावी लागेल सर्व मल्टिस्टेट चा व्याजदर हा एकच नाही तर प्रत्येक मल्टिस्टेट ही वेगवेगळ्या योजना काढून ठेवीदारांना आकर्षक व्याजदराच्या आमिषाला बळी पाडण्यासाठी इतरांपेक्षा वाढीव व्याजदर देण्यासाठी स्पर्धा लागलेली आपण पहात आहोत आणि ठेवीदार देखील यांच्या आमिषाला बळी पडत असल्याने कालांतराने आपली फसवणूक झाली हे लक्षात येते ,आणि मग गुन्हा दाखल करण्यासाठी धावपळ सुरू होते ,ठेवीदारांनी कोणत्याही खासगी बँकेच्या आकर्षक व्याजदराला बळी न पडता आपला पैसा कोणत्या ठिकाणी सुरक्षित राहू शकतो त्या ठिकाणी आपली ठेव ठेवणे गरजेचे आहे  ,अनेक मल्टिस्टेट पतसंस्थां चालकांनी  ठेविदारांची वाट लावल्याने चांगल्या स्थितीत असलेल्या मल्टिस्टेट पतसंस्थाना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे त्यामुळे त्यांचे देखील नुकसान होत आहे हे नाकारता येणार नाही.

*मातोश्री महिला नागरी सहकारी पतसंस्था बंद असल्याने ठेवीदार धास्तावले *

बीड शहरात असणारी ही पतसंस्था गेल्या 15 दिवसापासून बंद असल्याने ठेवीदारामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी डी डी आर कार्यालयाकडे तक्रारी देखील केल्या असल्याचे समजते आहे ,परंतु डी डी आर कार्यालयाकडून संपुर्ण तपासणी अहवाल मिळत नाही तो पर्यंत यामधील सत्यता समोर येणार नाही ,परंतु 15 दिवसापासून बंद अवस्थेत ही पतसंस्था दिसू लागल्याने अनेक ठेवीदार चांगलेच धास्तावले असल्याचे दिसून येत आहे.

Spread the love
Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.