October 6, 2022

मुख्य संपादक-अशोक होळकर मो-9130117000

ग्रीनगोल्ड कंपनीचे  सोयाबीन उगवले नाही, हजारो रुपयांचा खर्च मातीत

1 min read

ग्रीनगोल्ड उगले नाही म्हणजे खात्रीच्या म्हशीला टोनगा म्हटल्यासारखे झाले !

बीड (प्रतिनिधी)

ग्रीनगोल्ड कंपनीचे सोयाबीन हे अतिशय खात्रीशीर असल्याचे अनेकवेळा शेतकरी चर्चेतून सांगत आहेत  त्यामुळे विश्वासाने हे बियाणे घेऊन जातात परंतु खात्रीच्या म्हशीला टोनगा झाल्यासारखे शेतकऱ्याला धोका झाला असल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले आहे  केज तालुक्यातील लहुरी येथील एका शेतकऱ्याने दोन एकर क्षेत्रावर पेरणी केलेले सोयाबीनचे ग्रिनगोल्ड कंपनीचे केडीएस ७२६ वाण उगवून न आल्याची तक्रार तालुका कृषी अधिकाऱ्याकडे केली आहे. हजारो रुपयांचा केलेला खर्च मातीत गेला असून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. 

   लव्हुरी ( ता. केज ) येथील शेतकरी भारत बन्सी चाळक यांची शिवारातील सर्वे नं. १८५ /१ मध्ये शेतजमीन आहे. त्यांनी शहरातील विजय कृषी सेवा केंद्र दुकानातून सोयाबीनचे ग्रिनगोल्ड कंपनीचे केडीएस ७२६ या वाणाच्या २२ किलोच्या दोन बॅग ( प्रति बॅग ३ हजार ४५० रुपये ) खरेदी करून २ एकर क्षेत्रावर २० जून रोजी पेरणी केली होती. पेरणीनंतर केवळ ३० ते ३५ टक्के सोयाबीन उगवून आले. सोयाबीन बियाणे उगवून न आल्याने चाळक यांचा बियाणे, खते आणि पेरणीसाठी केलेला २० हजार रुपये खर्च मातीत गेला आहे. या शेताची पाहणी व पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी भारत बन्सी चाळक यांनी तालुका कृषी अधिकाऱ्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे
शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात असतांना असे बियाणे जर उगवले नाही तर शेतकरी देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही सदरील कंपनीने या शेतकऱ्याला दिलेली बॅग ही ओरिजनल आहे की बोगस याची खात्री करून शेतकऱ्यास नुकसान भरपाई देण्यात यावी आणि कंपनीच्या नावाखाली कोणी असे बियाणे बोगस विकत असतील तर त्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याची गरज आहे अन्यथा कंपनीचे नाव खराब होण्यास वेळ लागणार नाही हे त्रिवार सत्य आहे. 

Spread the love
Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.