October 6, 2022

मुख्य संपादक-अशोक होळकर मो-9130117000

गणपत(आप्पा) डोईफोडे सर्वसामान्य जनतेच्या मनातलं नेतृत्व -हर्षद डोईफोडे

1 min read

सामान्य कुटुंबातून राजकारणात सत्तेत येणे तसेच सहज सोपे नसते, पात्रता असताना देखील ती अस्थळण्याची शर्यत आसते , मात्र काही भूमिपुत्र सिद्ध होतात आणि त्यांची सिद्धता सेवा या शब्दात समर्पित होते. गणपत डोईफोडे हे त्यातलेच एक नाव, जिल्हा परिषद सदस्य म्हणून असलेला लौकिक आणि बीड मार्केट कमिटीचे उपसभापती असलेले गणपत आप्पा म्हणजे शेतकरी व सामान्य लोकांचा आधार ठरले आहेत.
तसे गणपत आप्पा हे नाव माझ्यासाठी सर्वस्वच आहे.आप्पांनी माझ्या पाठीवर ठेवलेला हात माझ्यासाठी सर्वस्व ताकद,विश्वास,आणि सर्वस्व पद आहे.आज त्यांचा वाढदिवस .नात्याने भाऊ असलेले आप्पा माझ्यासाठी आदर्श व्यक्तीचं आहेत.जयदत्त अण्णांच्या तालमीत वाढलेला हा लोकनेता हा विधानसभेच्या निकालात प्रभाव टाकेल एवढा लोकमान्य झाला आहे.2024 च्या गुलालात ज्यांचा वाटा असेल त्यात एक नाव गणपत डोईफोडे असेल ज्या बाजार समितीत आप्पांनी मजुरी केली त्याच बाजार समितीचे आप्पा आज उपसभापती आहेत जनतेशी असलेली नाळ आणि सर्वांशी दिलखुलास पणे वागणं यामुळेच आप्पांची आज युवा वर्गामध्ये मोठी फौज आहे प्रत्येकाला आपलेसे वाटणारे आप्पा आज जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवतात आहेत
मा.मंत्री जयदत्त आण्णा च्या नेतृत्वाखाली आणि जनतेचा आशीर्वादाने आज आप्पा बीड जिल्हा परिषदेचे सदस्य तर बीड बाजार समितीचे उपसभापती आहेत .सदैव जनतेशी नाळ असलेले आप्पा तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात चर्चेत आहेत. कितीही विरोधक असला तरीही त्यांच्या सोबत नम्र पणे आणि आदराने बोलणे ही आप्पांची अनोखी शैली आहे. ज्यावेळेस आप्पा जिल्हा परिषद झाले तो दिवस कायम आठवणीत राहील आप्पांच्या चेहऱ्यावर आलेले ते आनंदाश्रू मी स्वतः पाहिले आहेत संकट कितीही मोठा येवो त्याला सामोरे जायची ताकद आज फक्त या एका व्यक्ती मुळ येते.जनतेच्या मनावर आजही राज्य करणारे अप्पा आणखी मोठ्या पदावर जावं हीच माझीच नाही तर गुगळा देवीच्या परिघातील प्रत्येकाची अतिव भावना आहे. हक्काचा आवाज हक्काचा आधार असावा ही प्रत्येक गावकरी माणसाची इच्छा असते गणपत आप्पा त्यातलेच एक नाव. संघर्षीचे एक तप मागे टाकणारा हा भूमिपुत्र आमचा स्वाभिमान अभिमान आहे .शून्यातून विश्व निर्माण करण्याचा विचार ज्याच्या कार्य कृत्वाची सिद्धता आणि साक्ष आहे असे गणपत आप्पा आदर्श नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.

Spread the love
Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.